मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी;एका महिला नातेवाईकाशी उद्धट वागल्याने त्या चालकाबाबत तीव्र नाराजी आहे
कणकवली-: ओरोस येथील कोव्हिड मृत रुग्णांना घेऊन जाऊन दहन करणे यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिकृत रित्या ठेवलेल्या एका रुग्णवाहिकेचा मालक विशाल जाधव याने एका महिलेशी उद्धटपणे बोलून शिवीगाळ करत पतीला उचलून नेण्याची धमकी देत. पेशंट तडफडत राहील, जिल्ह्यातील एकही रुग्णवाहिका मिळणार नाही. असे बोलत रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास दिला आहे. त्यामुळे त्या रुग्णवाहिका धारकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे केली आहे. ओरोस येथील रुग्णाना अन्य ठिकाणी नेण्यासाठी भरमसाठ बिल देखील घेतले जाते. कमी बिल घेणाऱ्या रुग्णवाहिका ना येथे येण्यास मजाव केला असून, या भागात दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा तक्रार अन्य काही रुग्णवाहिका चालक मालक यांनी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी निवेदनातून दिली आहे.
