गॅस, पेट्रोल-डिझेल अभावी शेतकरी, मच्छीमार व नागरिक अडचणीत; मंत्री- अधिकाऱ्यांच्या ताफ्यावरही निर्बंध लावण्याची केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२७-: नागरिकांना सध्या इंधन टंचाईची झळ बसत असून,यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अशावेळी शासन इंधन टंचाई नसल्याचे सांगत आहे.मात्र सद्य स्थिती ही इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे आज शिवसेना( उबाठा) च्या वतीने तहसीदारांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,शासन स्तरावरून पेट्रोल डिझेल गॅस यांची टंचाई नाही असे सांगण्यात येत असून आणि दुसऱ्या सिलेंडर साठी प्रत्येक ठिकाणी गॅस ग्राहकांच्या चार दिवस रांगा लावून सुद्धा सिलेंडर मिळत नाही. नोंदणी केलेल्या ग्राहकांना सुद्धा एक एक महिना सिलेंडर मिळत नाही, पेट्रोल डिझेल जिल्ह्यात कोणत्याही पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही अशी परिस्थिती असताना, आज आंबा ,काजू बागायतदारांची काही प्रमाणात असलेली शेती शहराच्या ठिकाणी आणण्यासाठी गाड्यांची सोय उपलब्ध नाही ,त्यामुळे आंबा काजू हे पीक शेतात कुजत आहे .मच्छिमार बांधव सुद्धा याच संकटाला सामोरे जात आहेत मात्र मंत्री, शासकीय अधिकारी गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत त्यांना इंधन टंचाई ची कोणत्याही प्रकारची झळ पोचलेली दिसत नाही .मात्र सर्व साधारण नागरिकांनाच याची झळ बसत असून, टंचाईमुळे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका किंवा अन्य गाडी उपलब्ध होत नाही .यामुळे शिवसेना उबाठा च्या वतीने निवेदनामार्फत नागरिकांसाठी शासन स्तरावर टंचाईच्या काळात खालील सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यात,आंबा काजू बागायतदार, शेतकरी, मच्छीमार यांना मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध करून द्यावा ,जेणेकरून त्यांना आपला व्यवसाय करता येईल. मुले व सर्वसामान्य नागरिक यांना लागणारे शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, मंत्री व शासकीय अधिकारी यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करून शासकीय दौऱ्यावेळी एकाच गाडीचा वापर करण्यात यावा. रुग्णवाहिकेसाठी मुबलक इंधनपुरवठा करून मागेल त्या नागरिकाला तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी तसेच नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावा.यां समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा असेही रुपेश राऊळ यांनी म्हटले .
यावेळी चंद्रकांत कासार,राजू शेटकर विनोद ठाकूर विनोद काजरेकर प्रशांत बुगडे, सुनील गावडे, आदी उपस्थित होते
