साटेली येथे काजू बागेला आग लागून काजू,कोकम झाडांचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.२६-: साटेली तर्फ सातार्डा येथील साटेली खालचीवाडी येथील सचिन सखाराम कळंगुटकर(पाणजी) यांच्या मालकीच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील काजू बागेला शॉर्ट सर्किट ने आग लागून नुकसान झाले.
काल बुधवार २६ मार्च रोजी दुपारी एक च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ,आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र भर दुपारची वेळ असल्याने आग विझविणे मुश्किल झाले होते.मात्र अथक प्रयत्न करून काही ग्रामस्थांनी पाण्याची सोय करून आग विझविण्यात आली .
मात्र या आगीत काजू,कोकम झाडांचे बरेच नुकसान झाले होते.
याबाबत सचिन कळंगुटकर यांनी सांगितले की,दुपारच्या सुमारास आग लागल्याचे कळताच त्वरित विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबंधित संपर्क करून माहिती देण्यात आली.यावेळी माहिती मिळताच विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी लागलीच घटना स्थळी धाव घेत,विद्युत पुरवठा खंडित करून ,आग विझविण्यात मदत केली.

वारंवार आग लागण्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून,या बाबत शासन स्तरावर मदत मिळत नसल्याने कळंगुटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेची विद्युत पुरवठा विभागाने तत्काळ दखल घेऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कळंगुटकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page