⚡सावंतवाडी ता.२६-: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन (शाखा सावंतवाडी) यांच्यावतीने सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला स्कॅनर भेट देण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयात स्कॅनरची आवश्यकता होती. ही उणीव लक्षात घेऊन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनतर्फे आपल्या योगदानातून स्कॅनर उपलब्ध करून दिला. यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी गटसमन्वयक कमलाकर ठाकूर, सचिन नाटेकर, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताराम फटनाईक, अरुण मौर्ये, रामनाथ राऊळ, रावजी परब, जनार्दन भागवत, रुद्राजी भालेकर, प्रमोद पावसकर, बाबाजी झेंडे, श्रीकृष्ण भगत, जयप्रकाश पेडणेकर आदी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. गटसमन्वयक कमलाकर ठाकूर यांनी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना यापुढेही योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताराम फटनाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलाकर ठाकूर यांनी केले.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनतर्फे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला स्कॅनर भेट…
