⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड येथे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून,सद्य स्थितीत घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसची सगळीकडे टंचाई सुरू असून,ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गॅस सिलेंडर मिळणे सध्या जिगरीचे झाले असून, गॅस टंचाईचे मोठे संकट निर्माण झाल्याचे दिसत आहे.काही ठिकाणी हॉटेल्स बंद पडली असून,आज मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत येथे संबंधित गॅस सिलेंडरची गाडी येणार म्हणून जवळ जवळ दीडशेहून अधिक ग्राहकांनी सकाळ पासूनच गॅस सिलेंडर साठी रांगा लावल्या आहेत.
मळेवाड येथे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा…
