वेंगुर्ला येथे आज श्री रामनवमी निमित्त “श्री रामाची महाआरती “…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला शहरातील श्री राम मंदिर येथे ( श्री रवळनाथ मंदिर नजिक ) श्री राम नवमी निमित्त आज गुरुवारी हिंदू धर्माभिमानी वेंगुर्ला यांच्यामार्फत श्री रामोत्सव साजरा करण्यात येत असून सायंकाळी 6 वाजता ” श्री रामाची महाआरती ” हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी 5वाजता चैत्र नवमी समूह मार्फत ‘श्री रामरक्षा पठण ‘ होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सर्वांनी रामोत्सवामध्ये पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू धर्माभिमानी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. तसेच श्री रामेश्वर मंदिर येथील राम मंदिर, मारुती मंदिर स्टॉप येथील हनुमान मंदिर व अन्य मंदिरामध्ये आज रामनवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.मारुती मंदिर स्टॉप येथील हनुमान मंदिर येथे विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता हरिपाठ, शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page