आंबोलीत रामजन्म उत्सव उत्साहात…

आंबोली,ता.२६: येथील राघवेश्वर मठ श्रीराम मंदिर तसेच बाजारवाडी येथील श्रीराम मंदिर येथे रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. आंबोलीत दोन राम मंदिर आहेत. बाजारवाडी येथील श्रीराम मंदिरात राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर राघवेश्वर येथील श्री राम मंदिर येथे कालपासून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्रभर भजन तसेच पहाटे प.पू.श्री.भारतदास महाराज मठात धार्मिक विधी कार्यक्रम करुन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील भाविका सह आंबोळीतील स्थानिक ग्रामस्थांनीही उत्साहात कार्यक्रम केला. दोन्ही राम मंदिरात महाप्रसाद होता. राघवेश्वर येथील श्री राम मंदिरात दर शनिवारी सत्यनारायण महापूजा असते आणि महाप्रसाद.पर्यटकांचे आणि भाविकांचे अध्यात्मिक केंद्र झाले आहे. हनुमान जयंती देखील दोन्ही मंदिरात साजरी केली जाणार आहे.आंबोलीत दोन राम मंदिर आणि चार हनुमान मंदिर आहेत.बाजारवाडी राम मंदिरात हनुमान जयंती पर्यंत पालखी काढली जाते.

You cannot copy content of this page