तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात उद्या रामनवमी उत्सव…

⚡मालवण ता.२५-:
मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री वाघेश्वर मंदिरात श्रीराम नवमी उत्सव दि. २६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व पूजा, १० वा. कीर्तन, दुपारी १२ वा. राम जन्म, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. कीर्तन, आरती, रात्री ११ वा. नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांसाठी मोफत सिक्ससीटर गाडीची सोय करण्यात आली आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page