⚡मालवण ता.२४-:
आचरा पिरावाडी गोल्डन बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या ५५ पिल्लांना कासव मित्र तथा बीच मॅनेजर सूर्यकांत धुरी, पिरावाडी पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी ग्रा.प. सदस्य सौ. पूर्वा तारी यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले.
यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल तन्वी माणगावकर, प्रज्ञा गावकर, होमगार्ड विनय घाडीगावकर, ग्रामस्थ अरुण नावगे, नंदा नावगे तसेच पर्यटक उपस्थित होते.
विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी कासव आचरा समुद्र किनाऱ्याला जास्त पसंती देत आहे. आचरा समुद्रकिनारा त्यांना सुरक्षित वाटत असून ही बाब आनंदाची आहे. कासवांच्या पिल्लांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न आहोत, चालू हंगामात आतापर्यंत शंभर कासव पिल्ले समुद्रात सोडली आहेत, असे यावेळी कासवमित्र सूर्यकांत धुरी यांनी सांगितले.
