⚡कणकवली ता.२४-: आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी नांदगाव – असलदे येथे ठिय्या मारत सोमवारी महामार्ग रोखला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता रोखला. तसेच आक्षेपार्ह भाष्य करून जमावाला भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (रा. शिरोळ), माजी आमदार वैभव नाईक (कणकवली), कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक (कणकवली), स्वस्तिक पाटील (इचलकरंजी), तात्या भिवा निकम (तोंडवली), हनुमंत उर्फ राजा म्हसकर (नांदगाव), उत्तम लोके (नाटळ), प्रवीण वरूणकर (तळेरे), आनंद ढोके (वाडातर), किरण टेंबुलकर (किंजवडे), गणेश गावकर (मिठमुंबरी), गणेश वाळके (मिठमुंबरी), विलास साळसकर (साळशी, देवगड), विजय पाडावे (किंजवडे), शंकर नाणेरकर (कुणकेश्वर), राजेंद्र पाटील (जामसंडे), जितेंद्र जाधव (पडवणे), अजय नानेरकर (कुणकेश्वर), नरेश डामरी (मिठमुंबरी), तिमिर माणगावकर (तळेबाजार), दिव्या कोचरेकर (भरडनाका – मालवण), अनिकेत फाटक (रेवतळे – मालवण), गोविंद चव्हाण (वायरी – मालवण), संजय नरे (कुंभारमाठ), संजय गावडे (अनसुर), विजय नाईक (वेतोरे), नागेश गावडे (वेंगुर्ला गावडेवाडी), व्यंकटेश नर (उंडील – देवगड), महेंद्र (पोंभुर्ले बागवाडी), अमोल जोशी (वाघोटन), प्रशांत वाडेकर (पोंभुर्ले), रवींद्र पाळेकर (पाळेकरवाडी), काशीराम पाळेकर (पाळेकरवाडी), संदीप डोळकर (गिरये देवगड), प्रभू विजय सुरेश (कुडाळ – आंदूरले), राजेंद्र शामराव गडयानवर (मुत्नाळ – गडहिंग्लज), असे मिळून ३७ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सूत्राने दिलेल्या माहिती नुसार तपासात निष्पन्न होणाऱ्या अजून काहींवर गुन्हे दाखल होणार आहेत.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंत्रे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ३७ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५(i), १३५(iii), ३७(१)(e), ३७(१)(f), ३७(३) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६(२), १८९(२), १९०, २२३, २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.
