वेंगुर्ला बाजारपेठ रस्ता कामामुळे नागरिकांतून समाधान…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला शहरातील गाडीअड्डा – मुख्य बाजारपेठ ते पोस्ट नाका पर्यंत मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिक, व्यापारी तसेच वाहनधारकांना त्रास होत होता. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने व नूतन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी वेळीच लक्ष घालून कामास सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिक, वाहनधारक यांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजारपेठ एरियातील गटारकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ता डांबरीकरण काम हाती घेण्यात आले.हे काम विशेष रस्ता अनुदान योजना अंतर्गत करण्यात येत असून उर्वरित काम त्वरित करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कार्यतत्परतेबाबत शहरातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page