कट्टा येथे २४ रोजी मालवण कृषी महोत्सव…

⚡मालवण ता.२२-:
मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे मालवण कृषी महोत्सवाचे आयोजन दि. २४ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. यावेळेत ओम साई मंगल कार्यालय, कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कृषी महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शेती अवजारे प्रात्यक्षिके आणि महाविस्तार AI नोंदणीची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसह तृणधान्य, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन, पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश असणार आहे. विविध सरकारी योजनांची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे. तरी महोत्सवास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page