⚡मालवण ता.२२-: आदर्श रिक्षा चालक मालक असोसिएशन कट्टा वराड समादेवी चौक यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी महापुरुष पार कट्टा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. यानिमित्त महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, स्थानिक भजने व रात्री ठीक 8.30 वाजता देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडी यांचा यक्ष मोहिनी हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श रिक्षाचालक मालक असोसिएशन कट्टा वराड यांनी केले आहे.
आदर्श रिक्षा चालक मालक असोसिएशन तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…
