गीता मांजरेकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा सावंतवाडी भंडारी मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्या पत्नी सौ. गीता मांजरेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पती जगदीश, विवाहित कन्या, मुलगा, दिर, जाऊ, नणंदा, पुतण्या, पुतणी, भाचे, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page