⚡सावंतवाडी ता.२०-: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी शहर महिला शिवसेनातर्फे येथील बापूसाहेब पुतळ्याजवळ दिवे लावून हिंदू नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी पारंपरिक पद्धतीने दिवे प्रज्वलन करत नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका किर्ती बोंदे यांच्यासह दिपाली सावंत, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सायली होडावडेकर, लतिका सिंग, स्वप्नाली गाटे, तृप्ती मालवणकर, प्रगती बामणे, मनिषा बांदेकर, मनिषा परब, अनिता शितोळे, सुप्रिया गावडे, मारिया डिसोझा, सत्वशिला कुपवडेकर, साजिदा रेडकर, अमिता सांरग, ऐश्वर्या सावंत, सुप्रिया रेडकर आदी उपस्थित होत्या. नववर्षात शहराच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
सावंतवाडीत शहर महिला शिवसेनातर्फे दिवे लावून नव्या वर्षाचे स्वागत…
