⚡मालवण ता.२०-:
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेत श्रेयश शिंदे, सई कांबळी, मोहिनी हडकर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानिमित्ताने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
वेशभूषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थित फोवकांडा पिंपळ येथे संपन्न झाला. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण संयोजक अमित खोत, भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, ललित चव्हाण, अमिता निवेकर, महिमा मयेकर, स्मृती कांदळगांवकर, विलास हडकर, रत्नाकर कोळंबकर, राजू बीडये, अरविंद मयेकर, सौगंध बादेकर, अनिकेत फाटक, अमृता फाटक, हनु हडकर, शानू वालावलकर, योगेश पटकारे, बबन परुळेकर, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्निल घाडी, तेजस चव्हाण, दत्तात्रय खरवते, सुरज खरवते,अमोल गावडे, हरेश पडते, पार्थ डिचवलकर, श्रीराज बादेकर यांसह सर्व सहकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट लहान प्रथम – श्रेयस शिंदे,गिरिजा महेद्र परुळेकर, सिया महेश कदम, अनुश्री सुभाष मेस्त्री, अंकुर शर्मा, अंश्रीत अमोल निकम, मंत्रा नितीन कोळंबकर, राहिल रूपेश तायशेटे. गट मोठा – प्रथम सई सुखानंद कांबळी, दाक्षायणी महेश जुवाटकर, रेवा सुहास जोशी, भक्ती दीपक शीर्सेकर, स्वरा हरेश फडते, सोहम विनायक पवार, खुशी संतोष सावंत, निर्भया जाधव. महिला गट खुला- प्रथम, मोहिनी हनुमंत हडकर, शांति तोंडवळकर, अश्विनी आचरेकर, सुचिता तायशेटे, शिल्पा गाड यांना अनुक्रमे सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी ज्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी अमृता फाटक मोबा : 7387580303 यांच्याशी संपर्क साधवा. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
