महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा ऐतिहासिक संगम..
⚡वैभववाडी ता.२०: महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक ऐतिहासिक सुवर्ण योग येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान येथे जुळून येणार असून या निमित्ताने भव्य दिव्य संत सोहळ्याचे श्री क्षेत्र गगनगड गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ माऊली यांच्या ७५० वा जन्मोत्सव श्री भक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा,तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जनक संत नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज समाधी सोहळा, छत्रपती संभाजी महाराज समाधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिम्मित संत पादुका आगमन आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अश्व दर्शनासाठी येणार आहे. याचबरोबर आणि यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील वारकरी,संत वंशज, संस्थान प्रमुख तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली पंचक्रोशीतील १० तालुक्यातील वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य दिव्य सोहळ्यात किर्तन,भजन, धार्मिक प्रवचने तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा वारसा अधिक दृढ होणार असल्याचे गगनगिरी संस्थापक संजय पाटणकर महाराज यांनी सांगितले आहे.
