आरोंदा गावेळवाडी येथे २५ रोजी श्री तुळजाभवानी उत्सव…

⚡सावंतवाडी ता.२०-: आरोंदा (गावेळवाडी) येथील प्रसिद्ध श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बुधवार २५ मार्च रोजी “उत्पत्ती दिन उत्सव “साजरा होणार असून,या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
या दिवशी मंदिरात सकाळी देवीची षोडशोपचार पूजा,विधी, सत्यअंबा व्रत,ध्वजारोहण सप्तशती शिव कवच, पाठवाचन होम हवन,आरती तीर्थप्रसाद,महाप्रसाद व सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजन.
रात्रौ ९ वाजता आजगाव दशावतारी नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.

या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर,आरोंदा गावेळवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page