रोजगार देण्यासाठी लवकरच तलावाच्या काठावर खाऊ गल्ली संकल्पना अमलात आणणार…

मोहिनी मडगावकर:पर्यटन वाढीसोबत रोजगार निर्मितीवर आमचा भर..

⚡सावंतवाडी ता.२०-: शहरात बेरोजगार महिला व तरुण युवक वर्गांना रोजगार देण्यासाठी लवकरच तलावाच्या काठावर खाऊ गल्ली ही संकल्पना अमलात आणण्यात येणार आहे त्या दृष्टीने युद्धपातीवर आमचे प्रयत्न सुरू असून निश्चितच यातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम नगरपरिषद प्रशासनामार्फत आम्ही करू अशी माहिती उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी आज येथे दिली. तर शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच नरेंद्र डोंगरावरून मोती काठावर रोप वे ही संकल्पना अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्या म्हणाल्या.
शहरातील हॉटेल पाॅम्पस हाॅटेल समोरील मोती तलावाच्या काठावर नगरपरिषद प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या खाऊ गल्लीच्या जागेची पाहणी आज सौ. मडगावकर यांच्यासह नगरसेविकांनी केली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शहरात उद्यान उद्यान सुशोभिकरणासोबत त्या ठिकाणी मोडकळीस आलेली खेळणी लवकरच सुधारण्यात येणार आहेत दुसरीकडे पर्यटन वाढीसाठी असून शहराचा श्वास असलेल्या नरेंद्र डोंगरावर मोती तलावाच्या काठावर रोप वे ही संकल्पना माझ्या डोक्यात आहेत लोकांच्या मागणीनुसार या याचा विचार आम्ही करत आहोत त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. लवकरच यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सुरू केला जाईल. रोपवे सोबतच बोटिंग प्रकल्प ही लवकरच सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल जेणेकरून पर्यटन वाढीसाठी याचा फायदा होणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या, शहरातील बेरोजगार महिलां व युवकांसाठी खाऊगल्ली उभारण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पाऊल टाकले आहेत त्या संदर्भात ठराव घेऊन निधिची तरतूदही करण्यात येत आहे शहरातील हॉटेल पाॅम्पस समोर असलेल्या जागेत यासाठी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. बेरोजगार महिला तसेच तरुणांना होणार आहे. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. आम्ही सुद्धा महिला लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चितच आमच्या पदाला साधीसे असे काम येत्या कार्यकाळात करून दाखवून. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर,सौ नीलिमा नाईक, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर आदी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page