⚡कुडाळ ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस आणि मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे. २१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रदर्शन स्थळाची पाहणी केली.
शनिवार दिनांक २१ मार्च ते बुधवार दि. २५ मार्च या कालावधीत कुडाळ हायस्कुलच्या पटांगणावर जिल्हास्तरीय सिंधू सरस आणि मिनी सरस २०२६ या भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात एकूण ७५ स्टॉल्स असणार आहेत. त्यामध्ये ५९ स्टॉल्स बचत गटांच्या विविध उत्पादनांचे आहेत. तर १४ खाद्य पदार्थ स्टॉल्स आणि २ बँकांचे स्टॉल्स आहेत. या प्रदर्शनाच्या स्टॉल्स आणि रंगमंच उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, डीआरडीए चे अधिकारी गणेश राठोड, कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सरस प्रदर्शन स्थळाची जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केली पाहणी…
