कुडाळमध्ये उद्यापासून ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस प्रदर्शन…

५ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्या होणार दिमाखात उद्घाटन..

​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे.
​२१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनात ७५ स्टॉल्स मधून जिल्ह्यातील बचत गटांची उत्पादने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांची मेजवानी जिल्हावासीयांना मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या पत्रकर परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह उपाध्यक्ष दादा साईल, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, नागेश आईर, रुपेश पावसकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, प.स. सदस्य अर्चना घावनळकर, निखिल कांदळगावकर, डीआरडीएचे गणेश राठोड, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना प्रमोद कामत म्हणाले, या ​कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खासदार नारायण राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर (भा.पो.से.), जि प सीईओ रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. ​२१ मार्च २०२६ रोजी ​सकाळी ११ ते २: पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन. ​दुपारी ३ ते ४: कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील महिलांसाठी ‘पैठणी स्पर्धा’ (नागेश नेमळेकर पुरस्कृत). ​सायंकाळी ४ ते ६.३०: जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे ‘डॉग शो’. रात्री ७ ते १०: ‘समई नृत्य’ (कुडाळ).
​ रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी ​सकाळी ११ ते २: पशु/कृषी मेळावा (पशुसंवर्धन व कृषी विभाग, जि.प.). ​दुपारी ३ ते ४: कणकवली व वैभववाडी महिलांसाठी ‘पैठणी स्पर्धा’. ​सायंकाळी ४ ते ७: ‘बाळूमामा ट्रिक्ससीन’ नाटक (नितीन आशयेकर). ​रात्री ७ ते १०: पाककला स्पर्धा व महिला ग्रुप डान्स स्पर्धा.
​ सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी ​सकाळी ११ ते १२: बँक वर्कशॉप आणि वित्तीय व्यवस्थापन कार्यशाळा. दु. १२ ते २ मुख्यामंत्री समुद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सरपंच/सदस्य/ग्रा.प. कर्मचारी यांचे उद्बोधन व यशोगाथांचे सादरीकरण. दु. ३ ते ४ महिलांसाठी पैठणी स्पर्धा, ५ ते ७ सांस्कृतिक कार्यक्रम (सर्व बचतगट महिला), ७ ते १० – चिमणी पाखरे कुडाळ डान्स ग्रुप कार्यक्रम.
मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी ११ ते २ महिला कार्यशाळा, ३ ते ४.३० पैठणी स्पर्धा, ४.३० ते ६.३० कळसूत्री खेळ, सदारकर्ते चेतन गंगावणे, ७ ते १० रंगी रंगला महाराष्ट्र.
बुधवार दि. २५/०३/२०२६ रोजी या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. यामध्ये सकाळी ११ ते २ बक्षीस वितरण, आभार प्रदर्शन आणि समारोप अशी काय्रक्रमची रूपरेषा असे प्रमोद कामत यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कलागुणांना आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या ‘सिंधूसरस’ प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page