⚡सावंतवाडी ता.१९-: बेस्ट आऊट ऑफ वेस्ट म्हणजे टाकाऊतून टिकाऊ अशा पर्यावरण पूरक वस्तू तयार करण्याचा उपक्रम शाळा तळवणे नंबर एक मध्ये नुकताच राबविण्यात आला
जुनी वर्तमानपत्रे करवंट्या पुठ्ठे सुक्या मेव्याची टरफळे आईस्क्रीमचे चमचे शेंगदाण्याची टरफळे शिंपल्या अशा विविध टाकाऊ वस्तु पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांनी आकर्षक अशा कलात्मक वस्तू तयार केल्या
या वस्तू कशा तयार केला याचे उत्तम सादरीकरण देखील मुलांनी केले.
या उपक्रमासाठी मुलांना शाळेचे मुख्याध्यापक युवराज गोसावी सहशिक्षक बापूशेठ कोरगावकर शिवाजी कवडे मनीषा राऊळ नाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले
केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मेस्त्री, पालक ,ग्रामस्थ आदींनी या उपक्रमाबद्दल मुलांचे अभिनंदन केले.
