तिरोडा येथील श्री ब्राह्मण व परिवार देवतांचा २४ रोजी विविध कार्यक्रमांनी होणार वाढदिवस साजरा…

⚡वेंगुर्ले ता.१९-: तिरोडा (बामनवाडी )येथील श्री ब्राह्मण व परिवार देवतांचा मंगळवार २४ मार्च रोजी वाढदिवस साजरा होणार असून, यादिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ९ वाजता अभिषेक सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद ,दुपारी १:३० वाजता महाप्रसाद तसेच रात्रौ ठीक ९ वाजता “अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण ” यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे .तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केरकर परिवार तिरोडा बामनवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page