अनिल निरवडेकर यांच संजू परबांना चॅलेंज:तर मित्र म्हणायचे की नाही याची डेडलाईन ठरवण्याची वेळ आता आली..
⚡सावंतवाडी ता.१८-: गॅस पाईपलाईनच्या कामात पैसे घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा नाव जाहीर करावं, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करू असे सांगत संजू परब यांच्याकडून जनतेत ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्याचे काम सुरू असल्याची टीका प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज येथे केली
त्यांनी केली.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. निरवडेकर म्हणाले, गॅस पाईपलाईन कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून सत्ताधारी व्यक्तीवर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. परंतू, पुराव्याशिवाय आरोप करण्यात तथ्य नाही. त्यांनी कमिशन घेणाऱ्याच नाव घ्यावं, आम्ही सत्कार करू असं विधान केलं. संजू परब हे माझे मित्र आहेत. मात्र, मित्र म्हणायचे की नाही याची डेडलाईन ठरवण्याची वेळ आता आली आहे. गॅस पाईपलाईन संदर्भात रस्ते खोदाई आणि त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व अन्य बाबी संदर्भात नगरपालिकेचा विषय येतो. मात्र, त्या कंपनीला आवश्यक त्या परवानग्या, दरपत्रक शासन पातळीवरून मिळालेल्या आहेत. त्यामुळे कोणी चुकीचे आरोप करू नयेत. मुळात संजू परब हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते गांभीर्याने बोलत नसून हसत-हसत बोलतात. त्यामुळे त्यांच्या मनात एक आणि कृतीत दुसरेच असल्याचे दिसून येते. त्यांचे एकंदरीत बोलणे पाहता जनतेत फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी निलेश राणे यांची सभागृहातील भाषण बघावीत, त्यांचे हावभाव लक्षात घ्यावे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांचा चावा घेणाऱ्या कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त केला आहे. त्याला केंद्रात ठेवण्यात आला आहे. तसेच मोती तलावा काठच्या झाडाचं काय करायचं ? याचा निर्णय वृक्ष कमिटी घेणार आहे. तसेच पाणी पुरवठा व गॅस पाइपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण काम पुर्णत्वास येईल. काही ठिकाणी नळपाणी काम योग्य नसल्याचे म्हणणे आहे. त्यांच कंत्राट आम्ही सत्तेत येण्यापूर्वी संपलेले आहे. मात्र, नागरिकांच्या हिताचा विचार करून काम सुरु केलं आहे. त्यामुळे झालेल्या कामाच ऑडिट होईल नंतर बील अदा करण्यात येतील. अन्यथा, एकही रूपया दिला जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. तर प्रशासकीय काळात काही इमारत बांधकामांना परवानगी दिली गेली. चुकीच काम होत असल्याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय काळात झालेल्या या कामाची चौकशी होईल. तसेच कारवाईची क्षमता देखील आमच्यात आहे. त्यामुळे निश्चितच संबंधितांना न्याय दिला जाईल, येणाऱ्या काळात रिझल्ट दिसेल असा विश्वास ॲड. निरवडेकर यांनी दिला.
