⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ ची विद्यार्थिनी कु.मनस्वी शिवाजी कवडे ,गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञाशोध ( जी.टी.एस) परीक्षेत ह्या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
मनस्वी ही इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असून तिला या परीक्षेत एकूण १०० गुणांपैकी ९६ गुण मिळाले आहेत.
तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,तिला या परीक्षेसाठी वर्ग शिक्षिका मनीषा राऊळ तसेच तिचे वडील शिवाजी कवडे ,आई माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक युवराज गोसावी आरोंदा केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, केंद्र मुख्याध्यापक गणपत गावडे ,शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सचिन मेस्त्री तसेच सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
तळवणे शाळेची मनस्वी कवडे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तृतीय…
