आईच्या निधनानंतरही सईचा धाडसी निर्णय; दहावीचा शेवटचा पेपर दिला…

⚡कणकवली ता.१७-: शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सई संतोष सावंत हिने अत्यंत दुर्दैवी प्रसंगातही धैर्य दाखवत परीक्षेला हजेरी लावली. सई ही शिवडाव ओटोसवाडी येथील रहिवासी आहे. ती येथील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे शिक्षण घेत आहे. आज तिच्या दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर असताना, काल उशिरा रात्री तिची आई कै. सौ. साक्षी सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण परिस्थितीतही सईने खंबीरपणे परिस्थितीचा सामना करत, शाळेचे मुख्याध्यापक मुकेश पवार व शिक्षकांच्या सहकार्याने परीक्षेच्या केंद्रावर जाऊन शेवटचा पेपर दिला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page