⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस-कोंडुरे येथील कर्णबधिर व मतिमंद मुलांच्या शाळेत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तसेच संस्थेच्या संस्थापक व संचालिका सौ. रेखाताई गायकवाड यांच्या पुढाकाराने मुलांच्या उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ, केक, बिस्किटे व चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर करून दिली.
या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सावंतवाडी महिला तालुकाप्रमुख सौ. सौदागर, नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, सौ. स्नेहा नाईक, ह्युमन राईट जिल्हाध्यक्ष सौ. शिवानी पाटकर, तालुका सचिव सौ. सुप्रिता धारणकर, सदस्य सौ. पूजा नाईक, भारती परब तसेच आरोस सरपंच श्री. नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड आमदार डॉ. निलेश राणे यांना पाठवून शुभेच्छा दिल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच संजू परब यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
