⚡कुडाळ ता.१६-: बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धा 2025–26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
बॅ. नाथ पै सेट्रल स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेतील ६७ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत पारितोषिके आणि पुरस्कार मिळवले.
काही प्रमुख विजेते पुढीलप्रमाणे, रिशिता रुपेश राणे (इ. ९ वी) – A++ श्रेणी, प्रथम क्रमांक, डिंपल ललाराम कुमावत (इ. ५ वी) – A+ श्रेणी, द्वितीय क्रमांक, तीर्था महेश कोचरेकर (इ. ७ वी) – A+ श्रेणी, द्वितीय क्रमांक, आरव सिद्धेश बांदेकर (यूकेजी) – A श्रेणी, चतुर्थ क्रमांक, वीणा केदार केटगाळे(इ. ८ वी) – Eccentric Performer Award, प्रेक्षा मोतीराम मांजरेकर (इ. २ री) – Eccentric Performer Award.
या सर्व बक्षीस व प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापिका सौ. चैताली बांदेकर यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन करण्यात आले. प्रशालेच्या कला शिक्षिका सौ. पूर्णिमा गणेश शिरवलकर, प्रसाद कानडे आणि कु. प्राजक्ता मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांचे व सहकारी शिक्षकांचे कौतुक करून पुढील काळातही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रशालेने मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षक पालक संघानेही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या ६७ विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत यश…
