मनसे वाढविणार कोरोना रुग्णाची इम्युनिटी

प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविणार प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची संकल्पना

*💫सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र सेवा देत आहेत. या आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने आणि सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार पुढील 15 दिवस कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त सकस आहार पुरवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आज दि.23 मे 2021 पासून सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कोविड सेंटर ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उकडलेली अंडी तसेच फळे व विविध प्रकारचा आहार रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आजपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे यावेळी माजी जिल्हाउपाध्यक्ष ऍड अनिल केसरकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत देवेंद्र कदम मनविसे उपतालुका अध्यक्ष संकेत मयेकर अनुप सोनी आदी उपस्थित

You cannot copy content of this page