अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी…

मालवण ता.०६-:
वायंगणी दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी तिचे नातेवाईक तथा माजी पं. स. सदस्य उदय राजाराम दुखंडे यांनी मालवण पोलीस ठाण्याकडे केली आहे.

सौ. अंतरा दुखंडे या २२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. २४ फेब्रुवारी रोजी कालावल पुलाखाली झाडीत त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेबाबत उदय दुखंडे यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहितीवजा फिर्याद दिली आहे. अंतरा दुखंडे यांचा मृत्यू घातपातामुळे झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेला आठ दिवस उलटूनही मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसल्याने तपास जलदगतीने करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी उदय दुखंडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page