आरोंदा येथील बंद असलेले खार बंधाऱ्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा…

वादावर खारभूमी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर यांची यशस्वी शिष्टाई..

⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा येथील खारभूमी बंधारा क्रमांक दोन व अन्य भागातील शेती भागातील संरक्षित करण्यासाठी दगड मातीचा बंधारा बांधायचे काम खारभूमी विकास प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सदरील काम बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी खारभूमी खाते कार्यालयात वेगुर्ले येथे जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला व बंद पाडलेले काम त्वरित सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.
याची दखल घेऊन वेंगुर्ले येथील खारभूमी खात्याच्या सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ जमा झाले होते.
यावेळी सर्वांसमक्षच माईणकर यांनी जमीन मालकांना मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना वस्तुस्थितीची माहिती देत संबंधित जमीन मालकाची जमीन यां बंधाऱ्यामुळे संरक्षित होणार असल्याचे अभियंता माईणकर यांनी सांगितले.
त्यावर संबंधित जमीन मालकाने आपली कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले व बंधाऱ्याचे काम सुरू करण्यास मान्यता दिली, अशी माहिती अभियंता माईणकर यांनी यावेळी दिली.
खार संरक्षक बंधारा वाद
यशस्वीपणे मिटविल्याबद्दल शेतकऱ्यांनी माईणकर यांना धन्यवाद दिले.
मागील काही वर्षांपूर्वी बंधारा फूठून खाडीतील खारे पाणी शेती बागायती मध्ये घुसून शेत जमीन नापिक होऊन बागायती चे नुकसान होऊन झाडे पूर्णतः सुकून गेली होती. भात शेती करणेसुद्धा बंद झालेले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हा बंधारा होणे अत्यंत महत्वाचा होता.
यावेळी दीपक रेगे, देवेंद्र नाईक, उल्हास नाईक वासुदेव सातोस्कर, सावळाराम सतोसकर,हनुमंत नाईक, आनंद नाही ,तात्या रेडकर ,हनुमंत रेडकर ,दाजी रेडकर,ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, सिद्धेश नाईक गोविंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page