महिला दिनानिमित्त ‘द केरला स्टोरी 2’ चित्रपटाचे महिलांसाठी मोफत प्रदर्शन…

⚡देवगड ता.०६-:
सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी देवगड-जामसांडे येथे महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. आज किशोरवयीन मुलींना द केरला स्टोरी टू या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.

देवगड-जामसांडे भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या वतीने “द केरला स्टोरी 2” या चित्रपटाचे महिलांसाठी मोफत प्रदर्शन करण्यात येणार आहे.

हा चित्रपट देवगड-जामसांडे येथील कंटेनर थिएटरमध्ये दाखवण्यात आला. ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत चित्रपटाचे दोन शो आयोजित करण्यात आले आहेत

दरम्यान, या चित्रपट प्रदर्शन मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली. आजच्या दिवशी किशोरवयीन मुलींना हा चित्रपट दाखवण्यात आला. या शोसाठी देवगड येथील कंटेनर थिएटरचे व्यवस्थापक यश रानडे, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, महिला पदाधिकारी प्रियांका साळस्कर, तन्वी शिंदे, प्रणाली माने नंदिनी कोयघाडी देवगड महाविद्यालयाचे शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचा लाभ परिसरातील सर्व महिलांनी घ्यावा. विशेष म्हणजे हा चित्रपट रविवारी तीन वाजता महिलांसाठी मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

You cannot copy content of this page