क्रिएटीव्ह सखी ग्रुप, बांदाचे आयोजन…
⚡बांदा ता.०५-: जागतिक महिला दिनाचे औचित्य सांगून बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने
बांदा येथे शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 मार्च असे दोन दिवस “स्वयंसिध्दा मी ” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या व्यापारी भुवन, बांदा सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या आयोजनाबाबतची विस्तृत माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
व्यापारी भुवन बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या अध्यक्षा अंकिता स्वार तसेच रिया वाळके, रुपाली शिरसाट, वंदना पावसकर, उज्वला महाजन, श्रृती शिरोडकर, सिंधिया पावसकर,सावली कामत,स्नेहा पावसकर आदी सदस्य उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शॉपिंग स्टॉल्स, फुड स्टॉल्स, महिलांसाठी विविध स्पर्धांसह बरच काही असून त्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. ७ मार्च रोजी सकाळी 10 वाजता महिला उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते शॉपिंग फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. हे शॉपिंग स्टॉल्स दि. 7 व 8 मार्च रोजी स. १० वा. ते रात्रौ १० वा. सुरू असतील. सायं. ५ वा. खेळ पैठणीचा होईल. सायं. ४ वा. फुड फेस्टिवल स्टॉल्स चे उदघाटन गावातील आशा सेविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.हे स्टॉल्स दोन्ही दिवस सायं. ४ वा. ते १० वा. सुरू असतील.
८ मार्च रोजी सायं. ५ वा.महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा अंकीता स्वार यांच्या हस्ते होईल.
या कार्यक्रमात सर्वानी आवर्जून उपस्थित राहून भरपुर खरेदी करा आणि वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घ्या असे आवाहन क्रिएटीव्ह सखी ग्रुप च्या वतीने अध्यक्षा अंकीता स्वार यांनी केले आहे.
फोटो – (बांदा येथे होणाऱ्या “स्वयंसिध्दा मी” कार्यक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती देताना क्रिएटीव्ह सखी ग्रुप)
