आंबोलीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात …

आंबोली,ता.६ :माहिती शिक्षण व जनसंपर्क अभियान अंतर्गत,जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या विद्यमानाने अँस्कड अंतर्गत पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबीर आंबोली येथे उत्साहात पार पडले. पशु पालकांना डॉ. विद्यानंद देसाई तालुका पशु संवर्धन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. आंबोली ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सावंतवाडी यांनी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न माजी सरपंच तथा प्रशासक सावित्री पालेकर यांनी केले.यावेळी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, डॉ.समीर चंद्रकांत बिलोलीकर,जिल्हा उपायुक्त,पशुसंवर्धन, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक, डॉ.विद्यानंद देसाई,तालुका पशु संवर्धन अधिकारी, डॉ.रामचंद्र तेली (चौकूळ) डॉ. ऋषिकेश पाटील (आंबोली) संदीप पारसे, विठ्ठल रघु येडगे,शत्रुघ्न शेटये दूध संस्था प्रतिनिधी, डॉ.शरद अस्वले,सहाय्य्क आयुक्त पशुसंवर्धन, सावंतवाडी,डॉ.सुनाद बाळगी, मळेवाड, डॉ.विठ्ठल कराळे,माडखोल,डॉ.नितीन रेडकर ,कोकण विभाग,कोल्हापूर जिल्हा दुग्ध उत्पादक संघ गोकुळ तसेच मोठ्या संख्येने पशुधन पशु पालक उपस्थित होते. यावेळी पशुधनाचे व्यवस्थापन ,वैरण विकास योजना,जंत नाशक व गोचीड प्रतिबंधक उपाय योजना ,विविध साथीचे रोग,नियंत्रण व लसीकरण,कृत्रिम रेतन, गायी म्हशीतील वंध्यत्व कारणे व निवारण उपाय योजना,लंपी चर्मरोग लक्षणें,उपाय महत्व व फायदे,विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत डॉ.देसाई यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी देखील उपस्थिताना विविध योजनाचा लाभ घेऊन आपला भाग दुग्ध समृद्ध करण्याबाबत मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page