सावंतवाडीत रंगपंचमीचा जल्लोष…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात होळीच्या पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रंगपचमी साजरी करण्यात आली. रंगाची उधळण करत, कृत्रिम पाऊस पाडत डिजेच्या तालावर अबालवृद्धांनी रंगोत्सव साजरा केला. सायंकाळी इस्वटी महापुरुष सबनिसवाडा येथील रोंबाटान होळीचा खुंट येथे उत्सवाची परंपरेनुसार सांगता केली.

रंगपंचमीच्या निमित्ताने युवक युवतींनी डिजे, ढोल ताशांच्या गजरात रंगाची उधळण केली. रंगपंचमीला सावंतवाडीतील जयप्रकाश चौक, उभाबाजार, चितारआळीसह काही भागात उत्सवाचे स्वरूप आले होते. सायंकाळी उशिरा मोती तलावाच्या काठावरून टेम्पोतून मिरवणुकाही काढण्यात आल्या. शुक्रवारी व्यापारी वर्गान आपली दुकाने बंद ठेवत दुपारनंतर रंगपंचमीत सहभाग घेतला. शहरातील अनेक भागात डीजे, ढोल ताशांच्या गजरात आबालवृध्दांनीही उत्सवात सहभाग नोंदवला. पोलिसांनीही शहरात चोख बंदोबस्त ठेवला. येथील इस्वटी महापुरुष देवस्थानकडील रोंबाट परंपरेनुसार होळीचा खुंट येथे पोहचल्यावर उत्सवाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page