आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मुख्याध्यापक शिरीष नाईक यांचा २८ रोजी सेवानिवृत्तपर निरोप समारंभ…

⚡सावंतवाडी ता.२७-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चे मुख्याध्यापक शिरीष नाईक हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रशालेच्या वतीने शनिवार दिनांक २८ रोजी विद्या विकास हायस्कूल मध्ये निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री .नाईक यांनी आपला सेवाकाल ची सुरुवात १७ जुलै १९९३ रोजी केली होती.३३ वर्षे सेवाकाल मध्ये त्यांनी उत्कृष्ठ असे अध्यापनाचे कार्य करून बरेच विद्यार्थी घडविले.
अध्यापन करत असताना त्यांना बरेच पुरस्कार प्राप्त झाले. यात २०१४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचा स्वर्गीय बाळकृष्ण बागवे स्मृती आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार , सन २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण रत्न पुरस्कार , सन २०२१/ २२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव पत्र देऊन सन्मान, तसेच २१ /४/ २०२४ ते ३० /१२/ २००७ या कालावधीत साटेली तर्फ सातार्डा (ता.सावंतवाडी) गावाचे सरपंच पद भूषविताना “निर्मळ ग्राम पुरस्कार” तत्कालीन राष्ट्रपती सन्माननीय ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रात श्री .नाईक यांनी भरीव असे योगदान दिले असून, शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी त्यांचा सेवा कार्यभार पूर्ण होत असून,त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रशालेच्या वतीने त्यांचा विद्या विकास हायस्कूल आरोस मध्ये निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले असून,या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे

You cannot copy content of this page