मुख्यमंत्री कोकणात येवून गेले तेवढा वेळ आंघोळीला लागतो

भाजपच्या नीलेश राणेंची खोचक टिका

*💫सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जितक्या वेळासाठी कोकणात आले. तेवढा वेळ फक्त माणूस आंघोळीला घेतो. असा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी ते आले पण न पाहताच निघून गेले असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी फक्त एकाच ठिकाणी फेरफटका मारला असून, कोणत्याही वादळ ग्रस्तांची भेट घेतली नसून, नुकसानीचा पाहणी दौरा देखील रद्द केल्याने जोरदार टीका केली आहे. यावेळी निलेश राणे यांनी शिवसेना कोकणी माणसाला संपवायला निघाली असून, कोकणी माणसाने ते समजून जावे असा इशारा देखील दिला आहे.

You cannot copy content of this page