ग्रामस्थांचा आरोप; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला होता रस्ता*
*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील आंबेगाव ते मांडखोल हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला असून, ठेकेदार या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याची तक्रार संतोष राणे यांनी सरपंच्यांकडे केली आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. सबंधित रस्ता हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर झाला होता. परंतु, या कामाची मुदत संपल्यानंतर ही हे काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार मनमानी पणे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याचे काम पूर्ण करत आहे. या कामावर सबंधित विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा अंकुश नसल्याने या कामात त्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी संतोष राणे यांनी केला आहे. यावेळी सबंधित कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संतोष राणे यांनी केली असून, सबंधित कामाचा दर्जा सुधारण्यात यावा अन्यथा हे काम दुसऱ्या ठेकेदारास देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
