वेंगुर्ला तालुक्यात जि. प. साठी ठाकरे शिवसेनेचे कमबॅक…

पंचायत समिती मतदारसंघावार भाजपा – शिवसेना महायुतीचे वर्चस्व..

⚡वेंगुर्ला ता.०९-:
वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 9 पंचायत समिती गण साठी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद मध्ये 2 जागा ठाकरे शिवसेना, 2 जागा महायुती, तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार यांनी बाजी मारत विजयी झाले आहेत. तर पं. स. साठी 1 जागा ( महायुती) बिनविरोध झाल्यानंतर 8 जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे, तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद साठी ठाकरे सेनेने जोरदार कमबॅक केले आहे. तर पंचायत समिती वर महायुतीने (भाजपा – शिवसेना) निर्विवाद वर्चस्व राखताना ठाकरे शिवसेनाला पूर्णतः पराभूत केले आहे.
म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुती विजयी :
तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुती तर्फे शिवसेना उमेदवार यज्ञा देवदत्त साळगावकर( 3756 मते) या विजयी झाल्या आहेत. तर अपक्ष उमेदवार वंदना किरण किनळेकर ( 3734 मते), ठाकरे शिवसेना उमेदवार प्रतीक्षा चंद्रशेखर पाटकर या (922 मते) पराभूत झाल्या आहेत.नोटासाठी 181 इतके मतदान झाले आहे. म्हापण पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे विष्णू विठ्ठल फणसेकर हे महायुतीतर्फे (1714 मते) विजयी झाले आहेत.निकित अशोक राऊळ, अपक्ष ( 1545 मते), ठाकरे सेनेचे अशोक रमाकांत पाटकर (675 मते) हे पराभूत झाले आहेत. नोटासाठी 92 इतके मतदान झाले आहेत.
परुळे पंचायत समिती मतदारसंघ मधून महायुतीतर्फे शिवसेनेचे
सचिन दामोदर देसाई (2184) मते हे विजयी झाले आहेत.तर भाजपचे निलेश सामंत (2053 मते), ठाकरे सेनेचे वासुदेव विष्णू माधव (219 मते),अपक्ष उमेदवार संकेत मधुकर केळूसकर (47 मते) हे पराभूत झाले आहेत. नोटासाठी 66 इतके मतदान झाले आहे.
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघावर ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व :
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी मिळालेले विजय वासुदेव नाईक हे (4500 मते) मिळवून विजयी झाले आहेत. येथील (महायुतीच्या /अपक्ष) उमेदवार समिधा समिर नाईक या अनपेक्षित रित्या (4114 मते) पराभूत झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा सारंग यांना 227 मते व नोटासाठी 188 इतके मतदान झाले आहे. आडेली पंचायत समिती मतदारसंघमधून महायुतीचे नितीन रामचंद्र मांजरेकर (1832 मते) हे विजयी झाले आहेत. तर येथे अपक्ष उमेदवार समिर कुडाळकर (1611 मते) व ठाकरे सेनेचे नित्यानंद शेणई ( 1216 मते ) हे पराभूत झाले आहेत. वायंगणी पंचायत समिती मतदारसंघ मधून महायुतीच्या ( भाजपच्या ) शीतल बाबू राऊत या (2384 मते) मिळवून विजयी झाल्या आहेत. तर ठाकरे सेनेच्या ्रुतिका माडकर (1714 मते) पराभूत झाल्या आहेत. नोटासाठी 179 इतके मतदान झाले आहे.
तुळस जिल्हा परिषद मतदारसंघावर अपक्षाची बाजी :
तुळस जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सुजाता अजित पडवळ (3700 मते ) या विजयी झाल्या आहेत.तर महायुतीच्या योगिता यशवंत परब ( 3027 मते), ठाकरे सेनेच्या पल्लवी आरमारकर (1094 मते) या पराभूत झाल्या आहेत. नोटासाठी 130 इतके मतदान झाले आहे. तुळस पं. स. मधून महायुतीच्या सुचिता दत्तात्रय वजराटकर (2056 मते )या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तर अपक्ष उमेदवार नयना धुरी ( 398 मते), अपक्ष उमेदवार अमृता साळगावकर ( 1450 मते ) या पराभूत झाल्या आहेत. नोटासाठी 142 इतके मतदान झाले आहे. तर मातोंड पं. स. मतदारसंघ मधून महायुतीतर्फे भाजपचे शंकर शशिकांत घारे हे (1588 मते) मिळवून विजयी झाले आहेत. तर ठाकरे सेनेचे रमाकांत कोंडये (743 मते ), अपक्ष उमेदवार विजय रेडकर ( 1387 मते ), राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल बागायतकर (97 मते ) हे पराभूत झाले आहेत. नोटासाठी 90 इतके मतदान झाले आहे.
उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघावर ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व :
उभादांडा जिल्हा परिषद साठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे संजय दत्ताराम गावडे ( 4322 मते ) मिळवून विजयी झाले आहेत. तर येथे महायुतीतर्फे भाजपचे मनवेल फर्नांडिस हे (2861 मते ) पराभूत झाले आहेत. येथे नोटासाठी 133 इतके मतदान झाले आहे. उभादांडा पंचायत समिती मतदार संघातून महायुतीच्या साक्षी शैलेश नार्वेकर या ( 2188 मते ) विजयी झाल्या आहेत. येथे नोटासाठी 157 इतके मतदान झाले आहे. तर आसोली पंचायत समिती मतदारसंघातून महायुतीतर्फे ( भाजपचे ) संकेत धुरी हे बिनविरोध झाले आहेत.
रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ पुन्हा भाजपकडे : रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे ( भाजपचे ) प्रितेश शंकर राऊळ हे ( 3344 मते ) मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तर ठाकरे सेनेचे नामदेव राणे ( 1405 मते ), अपक्ष काशिनाथ नार्वेकर (59 मते ), अपक्ष उमेदवार किरण पालयेकर ( 2714 मते ), अपक्ष उमेदवार चंद्रहास पांडजी ( 84 मते ) हे पराभूत झाले आहेत. येथे नोटासाठी 144 इतके मतदान झाले आहे. रेडी पंचायत समिती मतदारसंघ मधून महायुतीतर्फे भाजपच्या प्रियांका शंकर घाटवळ ( 2453 मते ) मिळवून विजयी झाल्या आहेत. तर ठाकरे सेनेच्या वंदना कांबळी या ( 1559 मते ) पराभूत झाल्या आहेत. येथे नोटासाठी 287 इतके मतदान झाले आहे. शिरोडा पंचायत समिती गण मधून अपक्ष उमेदवार योगिता सिद्धेश परब – मसुरकर या (1242 मते ) मिळवून विजयी झाल्या आहेत. तर महायुतीच्या शिवसेनेच्या शीतल साळगावकर ( 1132 मते ), ठाकरे सेनेच्या समृद्धी कुडव ( 959 मते ) या पराभूत झाल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन गवस व दिनेश पाटकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर यांच्या योग्य नियोजनात मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पीएसआय शेखर दाभोलकर, योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व स्थानिक मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

You cannot copy content of this page