उबाठा आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा..
⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ दीपक नारकर (शिवसेना), माणगाव मध्ये रुपेश कानडे (शिवसेना), पावशीमध्ये तुकाराम उर्फ दादा साईल (शिवसेना), तेंडोलीमध्ये आरती पाटील (भाजप), पिंगुळीत गंगाराम सडवलकर (उबाठा), नेरुर मध्ये रुपेश पावसकर (अपक्ष), आंब्रड दीपलक्ष्मी पडते (शिवसेना), ओरोस मध्ये सुप्रिया वालावलकर (भाजप), वेताळबांबर्डे नागेश आईर (शिवसेना) विजयी झाले आहेत.
दरम्यान कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटातून शिवसेना पाच, भाजप २, उबाठा एक तर अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत.
