चार चाकी वाहनाला मळेवाड मध्ये भीषण अपघात…

चारही प्रवासी सुखरूप:गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान..

⚡सावंतवाडी ता.२७-: मळेवाड परबवाडी (राणेवाडी) येथील वळणावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोंदा वरून मळेवाडच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहनाला अपघात घडला.

मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील चारही प्रवासी सुखरूपपणे या अपघातून बाहेर पडले.
सकाळच्या सुमारास आरोंदा वरून येत असताना धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने परबवाडी (राणेवाडी)येथील वळणावर गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळून पलटी झाली.यावेळी गाडीचा मोठा आवाज आल्याने घटनास्थळी येथील ग्रामस्थांनी धाव घेत गाडीतील प्रवाशांना मदत केली. केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील चारही प्रवासी सुखरूप असून गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page