⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील
5 जि. प. गट साठी एकूण 29 अर्ज दाखल झाले आहेत. 10 पंचायत समिती गण साठी 50 अर्ज दाखल झाले आहेत.वेंगुर्ला तालुक्यात 15 जागासाठी 79 उमेदवारी अर्ज दाखल असून 1 अर्ज ( प्रसाद पाटकर – परुळे पं. स.)मागे घेण्यात आला असून तालुक्यातील नागरिकांचे लक्ष कोण अर्ज मागे घेणार,तसेच अपक्ष यांच्या भूमिकेकडे लागले आहे. आज सकाळी 11 वा. पासून 3 वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे ही अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार असून त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गट साठी उभादांडा 2, आडेली 10, रेडी 9, तुळस 4 व म्हापण 4 इत्यादी 29 अर्ज दाखल आहेत. तर 10 पंचायत समिती गण साठी म्हापण 8, परुळे 7, आडेली 9, वायंगणी 5, मातोंड 6, तुळस 4, आसोली 3, उभादांडा 2, रेडी 2 व शिरोडा 4 असे एकूण 50 अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 15 जागासाठी 79 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. 5 जिल्हा परिषद गट मधून भाजपा 3 , शिवसेना 2 , ठाकरे शिवसेना 5 , काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस (sp) 1 व अपक्ष 16 असे अर्ज दाखल आहेत. तर 10 पंचायत समिती गण साठी भाजपा 6, शिवसेना 6, ठाकरे शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस (sp) 3 व अपक्ष 27 इत्यादी एकूण 50 अर्ज दाखल झाले आहेत.
वेंगुर्ला तालुक्यात 15 जागासाठी 79 उमेदवारी अर्ज ; नागरिकांचे लक्ष अपक्षांच्या भूमिकेकडे…
