शिरोडा ग्रा. पं. च्या लेखी आश्वासनाअंतीनळपाणी योजनासंदर्भात शिरोडा ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर, गांधीनगर, केरवाडा व इतर भाग याठिकाणी नळपाणी योजना साठी शिरोडा ग्रामस्थांनी आज सकाळी शिरोडा येथे आदर्श आचार संहिता नियमावलीचे पालन करून उपोषण छेडले.या उपोषणात शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, बच्चू मलबारी, दिगंबर परब आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते. तर बाबा नाईक, राहुल गावडे , कौशिक परब , दिलीप गावडे., प्राची नाईक , बाबल गावडे , श्रीराम नाईक , लक्ष्मीकांत कर्पे , विद्याधर धानजी, संदीप धानजी, शेखर गोडकर, मनोज शारबिद्रे, रोहित पडवळ , प्रमोद गावडे ,नितीन तारी आदी ग्रामस्थ नळ पाणी योजना धारक व ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा होता. दरम्यान पुढील १५ दिवसात नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देऊन पुढील जबाबदारी शिरोडा ग्रामपंचायत वतीने घेण्यात आल्याने तसेच वेंगुर्ला पोलिस ठाणे , पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग, तहसीलदार यांनी आचार संहिता कालावधीत उपोषण न करण्या बाबतचे पत्र दिल्याने या सर्वांचा सन्मान राखून सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीने पुढील १५ दिवसांच्या मुदती पर्यंत उपोषण स्थगित करण्यात आले.

You cannot copy content of this page