दत्ता सामंत:विरोधकांकडे उमेदवारांचा अभाव, सर्व जागा जिंकण्याचा विश्वास..
⚡मालवण ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहे जर या निवडणुकीच्या महायुती मध्ये बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद महायुतीच्या नेत्यांकडे आहे त्यामुळे बंडखोरी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे असा ठाम विश्वास शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त करतानाच या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल आणि महाराष्ट्रात एक नवा इतिहास आम्ही घडवू, असा आशावादही श्री सामंत यांनी व्यक्त केला
मालवण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांनी मालवण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक उमेश नेरुरकर, शिवसेना युवा नेते संग्राम साळसकर, राजा गावकर, शेखर गाड, राजन माणगावकर, राजू बिडये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
पत्रकारांशी बोलताना श्री सामंत म्हणाले पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या निवडणुका भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उतरली आहे आणि ही महायुती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संपर्क मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुका लढविल्या जात आहे या निवडणुकीत महायुती चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त जागा जिंकणार असून सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यावर महायुतीचा झेंडा फडकेल आणि महाराष्ट्रात आम्ही नवा इतिहास निर्माण करू असे सांगून ते म्हणाले आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत असे असताना जर एखाद्या वेळेस बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद आमच्या महायूतीच्या नेत्यांकडे आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे असे वाटत असते मात्र एकालाच कोणाला तरी उमेदवारी मिळते त्यामुळे पक्षनिष्ठा आणि नेत्यांवर श्रद्धा असणारे लोक या निवडणुकीत पक्षाच्या नेतेमंडळींनी सांगितल्यानंतर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील असे ते म्हणाले
पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विरोधकांना उमेदवार मिळत नाहीही वस्तुस्थिती आहे ते उमेदवार शोधत आहेत सिंधुदुर्गात महायुतीची शंभर टक्के ताकद आहे याचे कारण म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते किंवा सरकार प्रत्येक प्रसंगाला, विकासाला धावून जात आहेत त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना यश मिळणार नाही सर्वच्या सर्व जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू, असेही ते म्हणाले
