बांदा–दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका…

वारंवार निवेदन देऊ नये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने २६ जानेवारी रोजी उपोषण: ग्रामस्थांचा इशारा..

⚡बांदा ता.२०-: बांदा-दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत शहरातील निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गडगेवाडी, चर्मकारवाडी (बांदेकरवाडी) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खाली सही करणारे निमजगा, गवळीटेंब शेटकरवाडी, गडगेवाड़ी, चर्मकारवाड़ी (बांदेकरवाडी) ग्रामस्थ बांदा यांच्यावतीने यापूर्वी दिनांक २ जानेवारी ते ९ जानेवारी एक स्मरण पत्र संबंधित खात्याकडे देण्यात आले होते. यामध्ये अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला गंभीर धोका याबाबत सविस्तर माहिती निवेदनाद्वारे सादर केले होते. सदर निवेदनामध्ये कलम 133 तसेच कलम 188 अन्वये तातडीची कारवाई करून अवजड
वाहतूक बंद करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली होती. तथापि, आजपर्यंत सदर बाबीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.
महिला, विद्यार्थी, शालेय मुले
व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सतत धोक्यात आहे. प्रशासनाकडून वारवार दुर्लक्ष होत असल्याने आणि अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला आमच्या लोकशाही हक्काचा वापर करून दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे
शांततामय व बिनशर्त उपोषणास बसण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, याची ही पूर्वसूचना आपणास देत आहोत
तरी उपोषण सुरू होण्यापूर्वीच आपण स्वतः लक्ष घालून 133 व 188 अन्वये योग्य ती तातडीची कारवाई करू्न अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत.
या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतूक सुरु असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उपोषनाच्या निर्णयावर ते ठाम आहेत.

You cannot copy content of this page