⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांनी आज 20 जानेवारी रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, भाजपचे पदाधिकारी प्रशांत प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते. आज मंगळवारी पाचव्या दिवशी एकूण 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रहास उमेश पांडजी – रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.तर आजपर्यँत एकूण 162 अर्ज विक्री झाली आहे, अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी केला आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल…
