⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला तालुक्यातील एकूण 10 पंचायत मतदार संघातून शिरोडा पंचायत समिती मतदारसंघातून सौ. योगिता सिद्धेश परब ( सुमती हरिश्चंद्र मसुरकर ) या उद्या बुधवारी 21 जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या शिंदे शिवसेना पक्षातून इच्छुक आहेत. त्यांचे पती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी 5 वर्षे शिरोडा पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम करताना 2.5 वर्षे उपसभापतीपद सांभाळताना अनेक विधायक व सामाजिक कामे केली आहेत. सिद्धेश परब हे आमदार दिपक केसरकर यांचे खंदे समर्थक असल्याने व योगिता परब या उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
योगिता परब शिरोडा पंचायत समिती साठी उद्या अर्ज दाखल करणार…
