माघी गणेश जयंतीनिमित्त सिंधुदुर्गनगरीत २० ते २३ जानेवारीदरम्यान सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-:
शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ सिंधुदुर्गनगरीच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्त २० जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ सिंधुदुर्गनगरीच्या वतीने जिल्हाधिकारी वसाहत सिंधुदुर्गनगरी येथे प्रतिवर्षीप्रमाणे मिती माघ शुद्ध चतुर्थी गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २० जानेवारी रोजी हळदी कुंकू तसेच वासाहतीतील मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. बुधवार २१ जानेवारी रोजी तारादेवी महिला ग्रुप केळुस यांचा फुगडी कार्यक्रम तसेच वासातील मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार २२ जानेवारी रोजी गणेश पूजन व सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी ५ ते ७ वाजता स्थानिक भजने व त्यानंतर रघुनाथ कदम दिग्दर्शित मालवण ग्रुपचे दोन अंकी विनोदी नाटक “प्रेमाचा झांगडगुत्ता” होणार आहे. तर शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ सिंधुदुर्गनगरीचे अध्यक्ष राजेश चव्हाण, सचिव सचिन माने, सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page