देवगडमध्ये जि.प व पं स निवडणुकीसाठी २६ अर्जांचे वितरण मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही…

⚡देवगड ता.१९-:
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यात आज सोमवार (१९ जानेवारी २०२६) रोजी इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन अर्जांचे अधिकृत वितरण करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, गटासाठी एकूण १२ तर गणासाठी १४ नामनिर्देशन अर्ज वितरित करण्यात आले. गट व गण मिळून एकूण २६ अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे.

गटासाठी वितरित अर्जांमध्ये भाजपाला ७, शिवसेनेला २, काँग्रेसला १, उबाठाला १ तसेच अपक्ष उमेदवारांना १ अर्ज देण्यात आला आहे.
तर गणासाठी भाजपाला ७, काँग्रेसला २, उबाठाला ३, शिवसेनेला १ आणि अपक्षांना १ अर्ज वितरित करण्यात आला आहे.

नामनिर्देशन अर्ज वितरणाच्या आजच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी उपस्थिती दिसून आली. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने देवगड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत निवडणूक वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page