वाहनांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली..
⚡दोडामार्ग ता.१४-: आंबेली–कोनाळकरवाडी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींच्या समोरील दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी घटनास्थळी पाहणी केली. सदर मार्गावर वाहतुकीची वर्दळ असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे व सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे
